राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी आतापर्यंत केवळ समारंभाचे मानद पद म्हणजे राष्ट्रपती ही ओळख पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यापूर्वीचे राष्ट्रपती मतदान करणे टाळत असत, मात्र नारायणन यांनी 1998 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करून मतदान न करण्याची प्रथा मोडीत काढली !
नारायणन प्रसंगी अतिशय कठोर व तेवढेच संवेदनशील होते. राष्ट्रपती पदाच्या काळात त्यांनी थेटपणे 06 डिसेंबर 1992 च्या घटनेबद्दल त्यांनी टिप्पणी करून, ती घटना लांच्छनास्पद होती आणि त्यानंतरची परिस्थिती गांधीजींच्या हत्येनंतरच्या स्थिती सारखी विषन्न असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. भारतीय प्रजासत्ताकच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात घटना डॉ. आंबेडकरांचा शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश समस्त भारतीयांसाठी महत्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन करून, त्यांनी आंबेकरांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून घटना पुनर्विलोकन आयोग स्थापन करणाऱ्या सरकारचा खरपूस समाचार त्यांनी 26 जानेवारी 2000 च्या भाषणात घेतला. त्यांनी दोन वेळा लोकसभा बरखास्त केली. एकदा इंद्रकुमार गुजराल यांनी राजीनामा दिल्यावर आणि त्यानंतर एआयडीएमकेने वाजपेयी सरकारचा पाठींबा काढल्यावर नारायणन यांनी स्वतंत्रपणे अनेक निर्णय घेतले. कारगिल युद्धाबाबत राज्यसभेत चर्चा करण्यास सरकारने तयारी दर्शवावी असा सल्ला त्यांना पंतप्रधान वाजपेयींना दिला होता. कारण 1962 च्या युद्धा वेळी वाजपेयींनी असाच आग्रह नेहरूसमोर केला होता आणि नेहरूंनी तो मान्य करून राज्यसभेत त्यावर चर्चा केली होती. तो संदर्भ खूप महत्वाचा होता. त्याच्या कारकिर्दीतील दोन खूप महत्वपूर्ण निर्णय म्हणजे, 1998 साली राज्यपाल सुंदरसिंग भंडारी यांनी शिफारस करूनही त्यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू केली नाही.
सर्वात महत्वपूर्ण निर्णय म्हणजे, 2002 साली गोधरा दंगली बद्दल, परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्याबद्दल त्यांनी स्वतःच्याच सरकारवर टीका केली. एवढेच नव्हेतर दंगली रोखण्यासाठी गुजरातला लष्कर पाठविण्याची शिफारस देखील त्यांनी केली होती.या कामातून त्यांनी स्वतःची ओळख नेहमीच 'घटनेच्या चौकटीत कार्य करणारा सक्रीय राष्ट्रपती' अशी निर्माण केली होती. राष्ट्रपती त्यांना असणारे अधिकार वापरून सरकारवर दबाव निर्माण करू शकतो हेच के. आर. नारायणन यांनी दाखवून दिले.
अशा अभ्यासू , कठोर आणि संवेदनशील राष्ट्रपतीचे 09 नोव्हेंबर 2005 रोजी निधन झाले.परंतु त्यांच्या कामामुळे ते नेहमीच भारतीयांच्या लक्षात राहतील..

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!